शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पास असूनही एसटीच्या प्रवासासाठी नापास ! शिक्षणासाठी खासगी वाहनांचा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 23:36 IST

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या अजब कारभारामुळे शिरवळ येथील विद्यार्थ्यांना खंडाळ्याला शिक्षणासाठी जाण्यासाठी एसटीचा पास असूनही खासगी वाहनाने जावे लागत आहे.

ठळक मुद्देशिरवळमधील विद्यार्थी, नागरिकांचा आंदोलनाचा इशारा; उपाययोजनेची मागणी

शिरवळ : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या अजब कारभारामुळे शिरवळ येथील विद्यार्थ्यांना खंडाळ्याला शिक्षणासाठी जाण्यासाठी एसटीचा पास असूनही खासगी वाहनाने जावे लागत आहे. विशेष म्हणजे खंडाळा पंचायत समितीने ठराव करूनही संबंधित ठराव हा केवळ कागदापुरता मर्यादित राहिला आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी शिरवळ नागरिकांनी परिवहनविरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

औद्योगिकदृष्ट्या प्रगत होणाºया व खंडाळा तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या शिरवळमधील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात खंडाळा येथील महाविद्यालयामध्ये शिक्षणासाठी जात असतात. दरम्यान, खंडाळा याठिकाणी जाण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी काढलेला एसटीचा मासिक पास म्हणजे केवळ शोपीस ठरत आहे. महामंडळाच्या पारगाव-खंडाळा आगाराकडून एसटी उपलब्ध करून देण्यात येत नसल्याने मासिक पास केवळ कागदापुरता मर्यादित राहिला असल्याचे विद्यार्थी सांगत आहेत. त्यामुळे विद्यार्थी-विद्यार्थिनींना आर्थिक व मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे.

याउलट खंडाळ्याला महाविद्यालयात जाणे व शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव आशियाई महामार्गावर येऊन थांबावे लागत आहे. त्यामध्येच महामार्गावरून जाणाºया एसटी विद्यार्थ्यांना पास असल्याने घेत नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी पालक येतात. त्यावेळी विद्यार्थ्यांना एसटीमध्ये घेण्यावरून पालक आणि एसटी चालक-वाहक यांच्यामध्ये वादावादीचे प्रकार होताना दिसत आहेत.

एकूणच एसटी महामंडळाच्या अजब कारभाराच्या नमुन्याचा सर्वसामान्य विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव खासगी वाहनाने खंडाळा याठिकाणी प्रवास करावा लागत आहे. प्रवास करत असताना कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण राहणार, असा प्रश्न शिरवळकर नागरिकांमधून विचारला जात आहे. 

शिरवळ येथील विद्यार्थ्यांना एसटी प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका बसत आहे. विद्यार्थ्यांना नाहक आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. एसटी प्रशासनाने याबाबत दाखल न घेतल्यास शिरवळकर नागरिकांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.- राजेंद्र तांबे, सदस्य खंडाळा पंचायत समितीशिरवळ येथील विद्यार्थ्यांच्या समस्येसंदर्भात लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाºयांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या मागणीप्रमाणे एसटीची सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे.- ज्योती गायकवाड, आगार व्यवस्थापक पारगाव-खंडाळा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरstate transportराज्य परीवहन महामंडळ